Sunday, February 1, 2015
गज्वी पोचले इंग्रजीत!
प्रेमानंद गज्वी हे मराठीतील
सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारे
नाटककार आहेत. त्यांच्या 'घोटभर पाणी', 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' या
तिन्ही नाटकांनी- अगदी बिनचूक शब्दांत सांगायचे तर पहिल्या एकांकिकेने आणि
नंतरच्या दोन नाटकांनी- मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ही
तिन्ही नाटके रूपांतराच्या निमित्ताने इंग्रजीमध्ये दाखल झाली आहेत. त्या
रंगभूमीवर ती प्रयोगक्षम ठरतात की नाही हे येत्या काळात कळेलच. 'घोटभर
पाणी'चे मराठीमध्ये तीन हजार प्रयोग झाले. या एकांकिकेत अस्पृश्यतेच्या
शापामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्याची वेदना मांडली आहे. त्यानिमित्ताने
गज्वी यांनी भारतीय संस्कृतीतील दांभिकतेचे वाभाडे काढले आहेत. 'किरवंत'
या नाटकाची प्रशंसा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. या नाटकात ब्राह्मण
'किरवंत'ला (अंत्यविधीची क्रियाकर्मे करणारी व्यक्ती) कशा प्रकारची वागणूक
देतो, याचे भेदक आणि वास्तव चित्रण केले आहे. 'जो ब्राह्मण समाज स्वत:च्याच
समाजाला न्याय देऊ शकत नाही, तो इतर समाजाला काय न्याय देणार आणि
सन्मानाने वागवणार,' असा जळजळीत प्रश्न या नाटकातून गज्वी यांनी उपस्थित
केला आहे. 'गांधी-आंबेडकर' हे नाटक म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील
संघर्षांची मांडणी करते. १९३१ सालच्या पहिल्या गांधी-आंबेडकर भेटीने हे
नाटक सुरू होते आणि गांधी हत्येनंतर आंबेडकरांच्या स्वगताने संपते.
गांधी-आंबेडकर यांचे संबंध सुरुवातीपासून तणावाचेच राहिले. त्याविषयी
त्यांच्या हयातीपासून बोलले जातेच आहे. हे नाटकही त्याचाच एक भाग म्हणून
अवतरले.
'घोटभर पाणी'चा इंग्रजी अनुवाद शांता गोखले यांनी तर 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' यांचा अनुवाद म. द. हातकणंगलेकर यांनी केला आहे. पहिल्या दोन्ही नाटकांत महाराष्ट्रीय समाजातील भेदक वास्तव तर तिसऱ्या नाटकांत हिंदू आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन भारतीय समाजपुरुषांमधील संघर्ष रेखाटला आहे. मराठीमध्ये ही तिन्ही नाटके नावाजली गेली, वाखाणलीही गेली. महत्त्वाचीही मानली गेली. कारण महाराष्ट्रात त्यांना मोठा इतिहास आहे. तसे इंग्रजीत होईलच असे नाही.
द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स : प्रेमानंद गज्वी,
अनुवाद- शांता गोखले, म. द. हातकणंगलेकर,
नवयान पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली,
पाने : १५५, किंमत : २५० रुपये.

गुलज़ार बोलतात त्याची कविता होते
भारतीय मध्यमवर्गाचा
ताळेबंद मांडणाऱ्या पवन वर्मा यांनी अलीकडे अनुवादकाच्या भूमिकेत प्रवेश
केला आहे आणि उर्दू-हिंदीतील लोकप्रिय गीतकार-कवी गुलज़ार यांची पुस्तके
इंग्रजीत अनुवादित करण्यास सुरुवात केली आहे. गुलज़ार यांच्या 'सिलेक्टेड
पोएम्स', 'निग्लेक्टेड पोएम्स' या दोन कवितासंग्रहानंतर 'ग्रीन पोएम्स' हा
त्यांनी अनुवादित केलेला तिसरा संग्रह. दरम्यान 'हाफ अ रुपी' या नावाने
गुलज़ार यांच्या निवडक कथांचाही अनुवाद केला आहे. वर्मा यांनी याआधी कैफ़ी
आज़्ामी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचाही इंग्रजी अनुवाद केला
आहे. त्यामुळे कवितांचा अनुवाद करायला ते सरावलेले आहेत, असं समजायला हरकत
नाही. या संग्रहात गुलज़ार यांच्या निसर्गाविषयीच्या ५९ कविता आहेत. नदी,
तळी, ओढे, पर्वत, बर्फ, पाऊस, ढग, आकाश, जमीन, हवा, झाडे यांच्याविषयीच्या
या कविता निसर्गाविषयीची हळुवार आणि चैतन्यशील भावना उजागर करतात. माती,
जमीन, पाणी याविषयी गुलज़ार यांचं आतडय़ाचं नातं आहे. निसर्गाला ते आपल्या
अवतीभवतीची सर्वात चैतन्यशील आणि रसरशीत दुनिया मानतात. त्यामुळे त्याविषयी
लिहिताना गुलज़ार आपली अक्षरे मोरपंखाच्या बोरूने लिहितात. या कविता म्हणजे
जणू काही निसर्गातील विविध घटकांची स्वगतं आहेत, फक्त ती गुलज़ार यांच्या
शब्दांतून उतरली आहेत. त्यामुळे आपलं म्हणणं सांगताना ती काव्यमय भाषेचा
आणि लीनतेचा आधार घेतात. अतिशय प्रेमानं आपल्याशी हिजगूज करतात. त्यामुळे
ही निसर्गसूक्तं आवाहनांनी भरलेली आहेत. त्यांच्या हाकांनी आपलं लक्ष वेधून
घेतात.
गुलज़ार ज्याला स्पर्श करतील त्याची कविता होते. त्या कवितेला लय, नाद, स्वाद, रुची, गंध, सारं काही असतं. म्हणून ती समोरच्याला वेढून टाकते. या कविता वाचकाला नवी 'नजर' देतात, निसर्गाकडे पाहण्याची. त्याला अनुभवण्याची. त्याच्या जवळ जाण्याची. आणि त्याला आपल्यात सामावून घेण्याचीसुद्धा.
वर्मा यांनी इंग्रजी अनुवादाबरोबर त्यांचे हिंदी लिप्यंतर दिले आहे. त्यामुळे अनुवाद ताडून पाहण्याचीही आयतीच सोय झाली आहे.
ग्रीन पोएम्स : गुलज़ार, अनुवाद - पवन के. वर्मा,
पेंग्विन बुक्स, गुरगाव,
पाने : १३१, किंमत : २५० रुपये.

भारत नावाचं डम्पिंग ग्राउंड
भारतातील इंग्रजी प्रकाशन व्यवसाय भारतीय मध्यमवर्गाबरोबरच वाढतो आहे. त्यामुळे अमेरिकेतील मोठय़ा प्रकाशन संस्थाही भारतीय बाजारात पेठेत दाखल होऊ लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच अॅमेझॉन डॉट कॉमनं पुस्तक विक्री आणि इतर वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीत उडी घेऊन फ्लिपकार्ट, इन्फिबीम, ईबे यांसारख्या काही कंपन्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. ही स्पर्धा इतकी अटीतटीची होऊ पाहत आहे की, 'आम्ही आमची कंपनी कुठल्याही परिस्थितीत कुणालाही विकणार नाही,' असं सांगणारे फ्लिपकार्टचे संस्थापक प्रमुख सचिन-बिनी बन्सल आता बंगलुरूमधील Myntra या ऑनलाइन कंपनीबरोबर विलीनीकरणाच्या पवित्र्यात आहेत. असो. सांगायचा मुद्दा असा की, या पाश्र्वभूमीवर 'भारत हे अमेरिकन साहित्याचं डम्पिंग ग्राउंड होण्याची शक्यता आहे,' असं विधान ब्रिटिश लिटररी एजंट डेव्हिड गॉडविन यांनी नुकत्याच कोलकात्यात झालेल्या साहित्य महोत्सवामध्ये केलं आहे. गॉडविन ही प्रकाशनक्षेत्रातील अतिशय जाणकार आणि अभ्यासू व्यक्ती आहे. याशिवाय ते अरुंधती रॉय, विक्रम शेठ, अरविंद अडिगा, किरण देसाई, विल्यम डॅलरिम्पल, जीत थाईल या बुकर प्राइझपर्यंत पोचलेल्या वा त्यासाठी नामांकन मिळालेल्या लेखकांचे 'लिटररी एजंट' आहेत. गॉडविन यांनी पुढं म्हटलं आहे की, 'मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे पण त्यामुळे छोटय़ा प्रकाशन संस्था स्पर्धेतून बाहेर फेकल्या जात आहेत.' मोठय़ा प्रकाशन संस्थांकडे मोठं आर्थिक बळ, यंत्रणा आणि संसाधनं असल्यानं छोटय़ा आणि एकहाती चालणाऱ्या प्रकाशन संस्थांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संस्था प्रकाशन व्यवसायातल्या 'समांतर चळवळी'चे शिलेदार आहेत. त्या प्रवाहाबाहेर फेकल्या जाणं, हे भारतीय प्रकाशन व्यवसायासाठीच नव्हे तर चांगलं साहित्य वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठीच आपत्ती ठरू शकतं. मात्र या नव्या बाजाराचा अमेरिकन प्रकाशन संस्था मोठय़ा प्रमाणावर फायदा करून घेत आहेत. सध्या भारतीय बाजारात ज्या प्रकारचं पल्प फिक्शन दिसतं, ते बहुतांशी अमेरिकन तरी असतं किंवा त्याचं अनुकरण तरी. रॅण्डम हाऊससारख्या मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत बेस्टसेलर ठरलेली वा ठरवली गेलेलीच पुस्तकं पाठवतात. याच प्रकाशन संस्थांची चांगली, दर्जेदार म्हणावी अशी पुस्तकं भारतीय पुस्तक विक्रेत्यांनी मागितली तर त्यांच्या मागणीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही वा ते गांभीर्यानं घेतलं जात नाही. बऱ्याचदा भारतात चांगली पुस्तकं विकत मिळत नाहीत, त्याचं कारणही हेच आहे. म्हणजे आपल्याला हवा तोच माल रेटत राहायचा, त्याचीच सवय लोकांना लावायची आणि रग्गड पैसा मिळवायचा, अशी सरळ सरळ व्यावसायिक रणनीती अमेरिकन प्रकाशन संस्थांची आहे. आणि त्यात आपण फसतो आहोत… निव्वळ कचरा माथ्यावर मारून घेत आहोत.
Tuesday, December 23, 2014
आशिक मस्त फकीर
चंद्रकांत खोत हे कवी-कादंबरीकार-संपादक तर होतेच, पण त्यांची खरी ओळख
'आशिक मस्त फकीर' अशीच आहे. त्याचे कारण त्यांची जगण्यावरची आशिकी. ती
शेवटपर्यंत कमी झाली नाही, त्यापायी त्यांनी फकिरीचीही फिकीर केली नाही.
लघुअनियतकालिकांच्या चळवळीतले एक शिलेदार, 'अबकडई' या प्रयोगशील दिवाळी
अंकाचे संपादक आणि आध्यात्मिक चरित्र कादंबऱ्या लिहिणारे लेखक असे
त्यांच्या आयुष्याचे तीन टप्पे दाखवता येतीलही, पण या तिन्हींचा कोलाज
त्यांच्यामध्ये कायमच वस्ती करून होता. इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व
गुंतागुंतीचे होते. त्यांच्या 'उभयान्वयी अव्यय', 'बिनधास्त', 'विषयांतर'
या बोल्ड कादंबऱ्यांनी सत्तरच्या दशकात खळबळ उडवून दिली. त्यातील
लैंगिकतेच्या उल्लेखांमुळे त्यांवर टीकाही झाली. लैंगिकतेचे उघडेनागडे
दर्शन घडवण्याच्या बाबतीत त्यांचे भाऊ पाध्ये यांच्याशी नाते जुळते.
समाजमान्य संकेत धाब्यावर बसवत त्यांनी तथाकथित संस्कृतिरक्षकांना अंगावर
घेत आव्हान दिले होते. 'अबकडई' या दिवाळी अंकाचे संपादकही खोतांची ओळख अधिक
सघन आणि समृद्ध म्हणावी अशी आहे. दिवाळी अंकांच्या रूढ चौकटींना फाटा देत
त्यांनी १९७३ ते ९४ या काळात डायरी, आत्मकथा, मुलाखती या विशेषांकांसह
तर्कातीत अनुभव, चमत्कार, पुनर्जन्म, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म अशा
वेगवेगळ्या विषयांवर २१ दिवाळी अंक काढले. दुर्गा भागवत, विश्वास पाटील
('नवी क्षितिजे'कार), डॉ. श्रीराम लागू अशा अनेक मान्यवरांना या अंकांतून
लिहिते केले, तर श्री. ना. पेंडसे यांच्यासारख्या काही मान्यवरांचे खास
लिहून घेतलेले लेख आवडले नाहीत म्हणून त्यांना मानधन देऊन ते न छापण्याचे
मराठीला अनोळखी असलेले धाडसही दाखवले. या अंकासाठी खोत वर्षभर मेहनत घेत.
त्यामुळे हे अंक दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपल्या लखलखीत वेगळेपणाने उठून
दिसत. यानंतरच्या टप्प्यावर खोत आध्यात्मिक लेखनाकडे वळले. 'दोन डोळे
शेजारी', 'अनाथांचा नाथ', 'गण गण गणात बोते', 'संन्याशाची सावली'
यांसारख्या चरित्र कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्याआधी त्यांच्याच
म्हणण्यानुसार पद्मा चव्हाण नावाचे कांड घडले. ते त्यांच्या आयुष्यातील एक
जीवघेणे वळणच. नंतर ते अज्ञातवासातच गेले. काही दिवसांनी ते भगव्या वेशात
आर्थर रोडशेजारच्या एका मंदिरात सापडले. त्या अवस्थेतून त्यांना अलीकडच्या
काळात लौकिकावस्थेत आणण्याचे प्रयत्नही झाले. नुकतेच त्यांच्या तिन्ही
कादंबऱ्यांचे पुनर्मुद्रण झाले. त्यांना एक-दोन पुरस्कार मिळाले. त्यांची
पंचाहत्तरीसुद्धा साजरी झाली. त्यांच्यावरच्या पीएच.डी.चे पुस्तकही
प्रकाशित झाले. थोडक्यात, खोतांचे लेखन आणि आयुष्य दोन्हीही वादळी राहिले.
एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे- म्हणजे डाव्या विचारसरणीकडून उजव्या
विचारसरणीकडे- झालेला प्रवास, लैंगिकतेविषयाच्या भावनांचे उघडउघड समर्थन
करणारा कवी-कादंबरीकार आणि सत्तरच्या दशकातील मुंबईतल्या चाळजीवनाचे
प्रत्ययकारी दर्शन घडवणारा लेखक व्हाया आध्यात्मिक कादंबऱ्या, संन्यासी
वृत्ती ते पुन्हा लेखक म्हणून उभे राहू पाहण्याची धडपड, ही खोतांच्या
आयुष्याची उलथापालथ बुचकळ्यात टाकणारी आहे. सात्त्विक प्रवृत्तीच्या
माणसांविषयी जसे भारतीय- विशेषत: महाराष्ट्रीय लोकांना आकर्षण असते तसेच
काहीसे तामसी प्रवृत्तीच्या लोकांबद्दलही असते. खोतांचा प्रवास तर
सात्त्विक- तामसी- सात्त्विक असा झाला. त्यामुळे त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाभोवती बरेच गूढ आणि अनाकलनीय प्रश्नांचे जाळे आहे. माणूस आणि
लेखक म्हणून खोत आव्हानात्मक आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेत
त्यांची उकल करून दाखवण्याचे धाडस कुणी तरी दाखवायला हवे. तसे झाले तर खोत
यांचा थांग लागू शकेल.
Saturday, December 20, 2014
...निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
डिसेंबर हा महिना जगभरातल्या वाचकप्रेमींसाठी काहीसा कुतूहलाचा असतो, कारण
या महिन्यात जगभरातली- विशेषत: इंग्रजीतील अनेक नियतकालिके, वर्तमानपत्रं
त्या वर्षांतील बेस्ट पुस्तकांच्या याद्या जाहीर करतात. परंपरागत वार्षिक
प्रथेप्रमाणे या वर्षीच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत, होत आहेत.
'पब्लिशर्स वीकली', 'द गार्डियन', 'गुड रीडस् डॉट कॉम', 'अॅमेझॉन डॉट कॉम',
'द टेलिग्राफ', 'द न्यू यॉर्क टाइम्स', 'किरकस रिव्ह्य़ू', 'मदर जोन्स'
(प्रसिद्ध अमेरिकन न्यूज-फीचर्स एजन्सी), 'टाइम', 'वॉशिंग्टन पोस्ट', 'द
ग्लोब अँड मेल', 'हफिंग्टन पोस्ट' अशा कितीतरी नियतकालिकांनी आपापल्या
याद्या जाहीर केल्या आहेत. कथा, कादंबरी, कविता, ललितेतर, वैज्ञानिक,
अनुवादित अशा विविध विषयांतील पुस्तकांच्या स्वतंत्र आणि एकत्रित याद्यांचा
त्यात समावेश आहे. या वर्षांतील रशियन भाषेतील बेस्ट, चायनीजमधील बेस्ट
अशाही याद्या काहींनी प्रकाशित केल्या आहेत.
या याद्या कितपत विश्वासार्ह असतात, असा प्रश्न काहींना पडू शकतो किंवा असाच प्रश्न 'या याद्या खरोखर मार्गदर्शक असतात काय?' असा बदलून घेतला तर काय दिसतं? आधी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. एक, या याद्या व्यक्तिसापेक्ष वा संस्थासापेक्ष असतात. दुसरं, 'अॅमेझॉन', 'गुड रीडस'सारख्या याद्यांमध्ये प्रकाशक, लेखक यांचं लॉबिंग असतं. या यादीत आपलं पुस्तक यावं, ते अमुक क्रमांकावर यावं इतक्या बारक्या बारक्या गोष्टींसाठीही लॉबिंग केलं जातं. तिसरं, यातल्या कुठल्याही याद्या एकमेकांशी फारशा जुळत नाहीत. म्हणजे बेस्ट नॉन फिक्शनच्या दोन याद्या एकमेकींशी ताडून पाहिल्या तरी हा फरक लक्षात येतो. चौथं, या याद्या सरसकट बनचुक्या असतात असंही नाही. त्यातली काही पुस्तकं ही खरोखर चांगलीही असतात. पाचवं, इंग्रजीत वर्षभरात जगभर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या अवाढव्य असते. (उदा. भारतात इंग्रजीत प्रकाशित होणारी पुस्तकं ही ६०-७० हजारांच्या घरात असतात, असं म्हटलं जातं.) त्यामुळे त्यातल्या काही महत्त्वाच्याच पुस्तकांची चर्चा, परीक्षणं प्रसारमाध्यमांतून येणं शक्य असतं. त्यामुळे अनेकदा या याद्यांमध्ये त्या वर्षांतली चांगली, पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चिली न गेलेली पुस्तकं असतात. काही वेळा खूप चर्चिली गेलेलीही पुस्तकं असतात. आणि सहावं, कुठल्याही यादीत निवडलेल्या पुस्तकांचा संक्षिप्त परिचय दिलेला असतोच. त्यामुळे त्या पुस्तकाची साधारण कल्पना येते. शिवाय त्या पुस्तकाविषयीची आणखी माहिती, त्याविषयीची परीक्षणे इंटरनेटवर शोधून, वाचून त्या पुस्तकांचा बऱ्यापैकी अंदाज बांधता येतो.
'वॉशिंग्टन पोस्ट'ने टेन बेस्ट, फिक्शन, ग्राफिक नॉव्हेल, रोमान्स, थ्रिलर, ऑडियो बुक्स अशा पाच-सहा याद्या प्रकाशित केल्या आहेत. त्यातील पहिल्या यादीतील जवळपास सर्वच पुस्तकं चांगली म्हणावीत अशी आहेत. 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेव्हन किलिंग्ज', 'फोर्थ ऑफ ज्युली क्रीक', 'द नॅरो रोड ऑफ द डीप नॉर्थ', 'द पेइंग गेस्ट्स', 'स्टेशन इलेव्हन' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं. यात अतुल गवांदे यांच्या 'बिइंग मॉर्टल'चा, बर्लिनचा इतिहास सांगणाऱ्या 'पोर्ट्रेट ऑफ अ सिटी थ्रु द सेंच्युरीज'चा आणि ढासळत्या पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या 'अननॅचरल हिस्ट्री' या तीन पुस्तकांचाही समावेश आहे. या यादीचं वैशिष्टय़ म्हणजे ही यादी कुणा एकाने केली नसून ती दहा वेगवेगळ्या समीक्षकांनी मिळून बनवली आहे.
'गुडरीडस्'ने तर वीस साहित्य प्रकारांतल्या पुस्तकांच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी वाचकांकडूनच त्यांची पसंती मागवली होती. त्यानुसार 'ललित' प्रकारात 'लँडलाइन'ला ४६,१५४, 'ललितेतर' प्रकारात 'द ऑपोझिट ऑफ लोन्लीनेस'ला १९,७९३, 'आत्मचरित्रां'मध्ये 'द स्टार वोन्ट गो आऊट'ला २७,८५०, तर 'कवितां'मध्ये 'लल्बीज'ला ९,५७१ वाचकांची पसंती मिळाल्याने या पुस्तकांनी त्या त्या प्रकारात पहिला क्रमांक पटकावला आहे.
'अॅमेझॉन डॉट कॉम'ने १०० बेस्ट सेलर पुस्तकांची यादी जाहीर केली असली तरी त्यांची वेबसाइट सातत्याने पाहणाऱ्यांच्या लक्षात येईल की, ती फारच घाऊक प्रमाणात केली आहे. कारण त्यातील 'स्ट्रेंग्थ फाइंडर २.०', 'फ्रोझन लिटल गोल्डन बुक', 'लाफ-आऊट जोक्स फॉर किडस', 'द फॉल्ट इन अवर स्टार्स', 'डायरी ऑफ व्हिम्पी किड' ही सुरुवातीची काही पुस्तकं गेली काही महिने तरी याच क्रमानं होती आणि यातील बहुतांश पुस्तकं ही मुलांसाठीची आहेत. त्यामुळे ही यादी फारशी जमेस धरता येत नाही.
'द टेलिग्राफ'ने 'बेस्ट नॉव्हेल्स अँड फिक्शन बुक्स' या प्रकारात ३३ पुस्तकांची नावं दिली आहेत. ही संपूर्ण यादी समीर रहीम यांनी केली आहे. प्रत्येक पुस्तकाबद्दल अगदी नेमका- एका ओळीचा- अभिप्राय नोंदवत त्यांनी आपलं भाष्य केलं आहे. रहीम हे टेलिग्राफचे सहायक ग्रंथ संपादक आहेत. गेली पाच-सहा र्वष ते साहित्य पत्रकारिता करत आहेत. वेगवेगळ्या निवड समित्यांवरही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांची यादी वेगळी नक्कीच आहे.
'द न्यू यॉर्क टाइम्स'ने २० बेस्टसेलर पुस्तकांची यादी १४ डिसेंबर रोजी प्रकाशित केली आहे. 'होप टू डाय', 'ग्रे माऊंटेन', 'द एस्केप', 'रिव्हावल', 'टॉम क्लान्सी - फुल फोर्स अँड इफेक्ट' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं. या पुस्तकांविषयी जेमतेम एका ओळीचा अभिप्राय नोंदवल्याने आणि ही नेमकी कुणी यादी केली आहे, त्यावर वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याविषयी काहीही न सांगितल्याने या यादीतल्या पुस्तकांमागची बुकंबातमी जाणून घेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार.
'द गार्डियन'ने बेस्ट पॉप्युलर सायन्सची यादी १८ डिसेंबर रोजी प्रकाशित केली आहे. त्यात 'हाऊ नॉट टू बी राँग- द पॉवर ऑफ मॅथेमॅटिकल थिंकिंग', 'विझार्ड्स, एलियन्स अँड स्टारशिप्स - फिजिक्स अँड मॅथ इन फँटसी अँड सायन्स फिक्शन', 'अॅलन टर्निग- द एनिग्मा', 'तम्बोरा - द इरप्शन दॅट चेंज्ड द वर्ल्ड' अशा बारा पुस्तकांचा समावेश आहे. त्याविषयी अकरा वाचकांनी आपली मतं नोंदवली आहेत. त्यातल्या अध्र्या लोकांनी या यादीविषयी असहमती दाखवली आहे. त्यातल्या काहींनी ही यादी अॅमेझॉनवरील यादीची कट- पेस्ट आवृत्ती असल्याचीही टीका केली आहे. एकानं म्हटलंय की, युरोपात गणित शिकवलं जात नाही. त्यामुळे या यादीचा काही उपयोग होणार नाही. जे शिकवलंच जात नाही ते वाचलं कुठून जाणार?
सरतेशेवटी 'पब्लिशर्स वीकली'बद्दल. हे साप्ताहिक १८७२ पासून न्यूयॉर्कहून प्रकाशित होत आहे. त्याचा खप पंचवीस हजारांहून अधिक आहे. यात अमेरिकेतील ग्रंथव्यवहाराची इत्थंभूत माहिती असते. हे साप्ताहिक ग्रंथजगतात बऱ्यापैकी विश्वासार्ह आणि नि:पक्षपाती मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या यादीकडे गांभीर्यानं पाहायला हरकत नाही. 'पब्लिशर्स वीकली'ने वीस बेस्ट पुस्तकांची यादी दिली आहे. प्रत्येक पुस्तकाची थोडक्यात माहिती दिली आहे. ज्यांना त्या पुस्तकाविषयी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी त्या पुस्तकाच्या 'पब्लिशर्स वीकली'मध्येच प्रकाशित झालेल्या परीक्षणाची लिंकही दिली आहे. ही सोय इतर कुठल्याही यादीमध्ये नाही. यामुळे त्या पुस्तकाविषयी लगोलग साक्षेपानं जाणून घेता येतं. 'ऑन इम्युनिटी - अॅन इन्कोल्यूशन', 'थर्टीन डेज इन सप्टेंबर', 'द कॉर्प्ससे एक्झिबिशन', 'लिमोनोव्ह' आणि 'दोज हू लीव्ह अँड दोज हू स्टे' ही त्यातील पहिली पाच पुस्तकं.
हा मागोवा अगदी थोडक्यात आणि स्थूलरूपात आहे हे खरं, पण यातून आपल्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम ठरवायला, क्वचितप्रसंगी आपल्याकडून निसटलेल्या पुस्तकांविषयी जाणून घ्यायला मदत होईल. बघायला तर सर्वच हवं पण त्यातून आपलीही निवड करायला हवी. 'फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!' ही केशवसुतांची वृत्ती या याद्याकर्त्यांमध्ये जशी डोकावते तशी या याद्या वाचून तिचा शिरकाव आपल्यात झाला तर त्यातून योग्य ते पाखडून घेता येईलच.

Saturday, November 22, 2014
एका पुस्तकापायी...
शेवटी ब्रिटिश सरकारने १५ मार्च ३३ रोजी आय.पी.सी. कलम २९५ ए अंतर्गत पुस्तक जप्त करण्याचे आदेश दिले. सरकारी रेकॉर्डसाठी पाच प्रती ठेवून बाकी साऱ्या प्रती जाळून टाकण्यात आल्या. म्हणजे नोव्हेंबर १९३२ मध्ये हा संग्रह प्रकाशित झाला आणि मार्च १९३३ मध्ये -म्हणजे अवघ्या चार महिन्यांनी- त्यावर बंदी आली. याशिवाय पुस्तक लेखकांना सामाजिक बहिष्काराला, धार्मिक-उग्र संघटना यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पण चारही लेखकांनी कुठल्याही प्रकारे माफी मागायला विरोध केला. ते आपल्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिले.
या पुस्तकानं उर्दू साहित्यात क्रांती केली. कथालेखनाला नवी दिशा दिली. एवढंच नव्हे तर सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, कैफ़ी आज़्ामी, हसन असकरी यांसारख्या अनेक लेखकांना प्रेरणा दिली. उर्दूमध्ये धार्मिक- सामाजिक रूढींबद्दल आणि स्त्री-पुरुष संबंधांबद्दल मोकळेपणानं लिहिण्याची परंपरा याच पुस्तकानं सुरू केली. या पुस्तकाचा प्रभाव हिंदी कथालेखनावरही पडला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या लेखनाचा प्रसार-प्रचार करण्याच्या हेतूनं एप्रिल १९३६ मध्ये प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यात या पुस्तकाचे लेखक आघाडीवर होते. त्यांच्या पहिल्या संमेलनाला प्रेमचंद यांना बोलावण्यात आलं... ते आलेही.
थोडक्यात धार्मिक उन्माद आणि कर्मठ सामाजिक रूढींच्या विरोधात ब्र उच्चारण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक. पण दुर्दैवानं त्यानंतर या संग्रहाचं बराच काळ उर्दूमध्ये पुनर्प्रकाशन होऊ शकलं नाही आणि त्याचा इतर भाषांमध्येही अनुवाद होऊ शकला नाही. १९९५ साली प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशननं त्याचं पुनर्प्रकाशन केलं, तर १९९० मध्ये शकील सिद्दिकी यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला.
त्यानंतर आता या पुस्तकाचे एकाच वेळी दोन इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही अनुवाद थेट उर्दूमधून केले आहेत. पहिला अनुवाद विभा चौहान व खालीद अली यांनी केला असून तो 'अंगारे- ९ स्टोरीज अॅण्ड अ प्ले' या नावाने प्रकाशित झाला आहे, तर दुसरा अनुवाद स्नेहल सिंघवी यांनी केला असून तो 'अंगारे' या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याच्या मुखपृष्ठावर 'द फर्स्ट- एव्हर इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ द बॅन्ड शॉर्ट-स्टोरी कलेक्शन' असं छापलं आहे. दोन्हींचे प्रकाशक वेगवेगळे आहेत.
सज़्जाद ज़्ाहीर यांची मुलगी नादिरा बब्बर यांनी 'अंगारे- ९ स्टोरीज अॅण्ड अ प्ले'ला प्रस्तावना लिहिली आहे. तर खालिद अली यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असून त्यात त्यांनी संग्रहातील चारही लेखकांचा परिचय, पुस्तकावरून उठलेलं वादळ, त्याविषयी उर्दू वर्तमानपत्रांमध्ये लिहिले गेलेले लेख आणि अनुवाद करण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हे पुस्तक पेपरबॅक या प्रकारातलं असल्यानं त्याची किंमत माफक म्हणावी अशी आहे.
याउलट स्नेहल सिंघवी यांचा अनुवाद हार्ड बाऊंड असल्यानं तो जरा महाग आहे. त्यांनीही आपल्या मनोगतात या पुस्तकानंतरच्या वादळाचा थोडक्यात इतिहास दिला आहे. याशिवाय मूळ उर्दू पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलं आहे. अनुवाद करताना त्यांनी मूळ पुस्तकाची शैली सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. परिशिष्टामध्ये तत्कालीन पोलिसांचं तक्रारपत्र, सेक्रेटरीचं पत्र आणि ज़्ाफर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेला लेख दिला आहे. दोन्हींची मुखपृष्ठं वेगळी आहेत. दोन्ही पुस्तकांच्या अनुवादकांनी मूळ वादाविषयी लिहिलं असलं तरी त्याची पुनरावृत्ती फारशी झालेली नाही.
प्रश्न निर्माण होतो की, वाचक म्हणून यापैकी कुठलं पुस्तक घ्यावं? तुम्ही हिंदी-उर्दूशी थोडेफार परिचित असाल तर आणि भारतीय इंग्रजी वाचणं एन्जॉय करू शकत असाल तर 'अंगारे- ९ स्टोरीज अॅण्ड अ प्ले' हे पुस्तक घ्यायला हरकत नाही. पण तुमचं प्राधान्य चांगला अनुवाद, चांगली इंग्रजी भाषा यांना असेल तर मात्र तुम्ही स्नेहल सिंघवी यांचं -थोडं महाग असलं तरी- पुस्तक घ्यावं.
एकच पुस्तक दोन वेगवेगळ्या लेखकांनी एकाच भाषेत एका वेळी अनुवादित करण्यामागं नेमकं काय कारण असावं? सध्या भारतात पुस्तकांवरील सेन्सॉरशिप वाढते आहे. दिनानाथ बात्रा हे त्यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव आहे. पण केवळ 'बात्रांचाच खतरा' आहे, असं नाही. आपल्या श्रद्धेय विषयावरील टीकात्मक लेखन स्वीकारण्याची भारतीय समाजाची मानसिकताच संकुचित होत चालली आहे. आणि त्याला हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, असा कुठलाही धर्म वा त्यांतील समाजगट अपवाद नाहीत. या पाश्र्वभूमीवर आपल्या लेखनाचा निडरपणे पुरस्कार करणाऱ्या, त्यावर ठाम राहणाऱ्या आणि कुठल्याही दबावाला बळी न पडणाऱ्या लेखकांचं 'अंगारे' हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. उर्दू साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या या पुस्तकापासून लेखकांना धैर्याची प्रेरणा मिळो आणि समाजकंटकांना सद्बुद्धी सुचो.
--------------------------
अंगारे : अनुवाद - स्नेहल सिंघवी, पेंग्विन बुक्स, गुरगाव, पाने : १६७, किंमत : ४९९ रुपये.
--------------------------
अंगारे : अनुवाद - विभा एस. चौहान, खालीद अल्वी, रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : १०५, किंमत: १९५ रुपये.
Sunday, November 9, 2014
कादंबऱ्यांतली बर्लिन भिंत
९ नोव्हेंबरला बर्लिन भिंत पाडायला सुरुवात केल्याच्या घटनेला २५
वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बर्लिनमध्ये वेगवेगळ्या सफरी,
व्याख्याने, चित्रपटांचे खेळ असे बरेच कार्यक्रम होत आहेत. याच आठवडय़ात
ब्रिटिश कादंबरीकार केन फॉलेट यांची 'हॅपी कोइन्सिडन्स' ही कादंबरी जर्मनीत
प्रकाशित झाली असून ती लोकप्रिय ठरली आहे. शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर
घडणाऱ्या या कादंबरीमध्ये बर्लिन भिंतीच्या कोसळण्याचा बराच
इतिहास आहे. सत्यकथा, फोटोंतून उलगडणारा इतिहास आणि ग्राफिक नॉव्हेल अशी
वैशिष्टय़ं असणारी ही कादंबरी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. त्यानिमित्ताने
बर्लिन भिंतीला मध्यवर्ती ठेवून लिहिलेल्या इतर काही कादंबऱ्यांची
संक्षिप्त ओळख करून घेणं रोचक ठरेल.
प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तचर कादंबरीकार जॉन ले कॅरे यांच्या 'द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड' या १९६३ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीला त्या वर्षीचा 'बेस्ट क्राइम नॉव्हेल' हा पुरस्कार मिळाला, तसेच १९६५ साली या कादंबरीवर चित्रपटही आला- ज्यात रिचर्ड बर्टन यांनी नायकाची भूमिका केली आहे. शीतयुद्धाच्या भराचा काळ. पूर्व-पश्चिम जर्मनीच्या मध्ये बर्लिन भिंत उभी आहे. अशा वेळी ब्रिटिश गुप्तचर अलेक लीमास काही गोपनीय माहिती मिळविण्यासाठी पूर्व जर्मनीत येतो; पण त्याची ही पहिली मोहीम फसते. त्याचे सहकारी मारले जातात; पण त्याला पुन्हा दुसऱ्या कामगिरीवर बर्लिनमध्येच पाठवलं जातं. तिथे त्याला जर्मन गुप्तचर पकडतात. एका अधिकाऱ्याला आपला वरिष्ठ हा ब्रिटिशांचा एजंट आहे, हे त्याच्याकडून सिद्ध करून घ्यायचं असतं, तर दुसऱ्याला ब्रिटिशांची गुप्तचर यंत्रणेतील काही महत्त्वाची माहिती हवी असते. कॅरे यांची विलक्षण हातोटी, गुंतागुंतीचं कथानक आणि रहस्यमयता यांनी भरलेली ही कादंबरी खूप खपली आणि वाचलीही गेली आहे.
ब्रिटिश कादंबरीकार लेन डेग्टन यांची 'बर्लिन गेम' ही गुप्तचर कादंबरी 'गेम' आणि 'सेट अॅण्ड मॅच' या त्रि-कादंबरीधारेतली पहिली कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली. पूर्व जर्मनीतील एका ब्रिटिश गुप्तचर एजंटला पश्चिम जर्मनीत जायचं असतं. त्याला मदत करण्यासाठी नायक बर्नार्ड सॅम्पसनची नेमणूक केली जाते. खरं तर तो पाच वर्षांपूर्वीच नोकरीतून निवृत्त झालेला असतो; पण ही कामगिरी त्याच्यावर सोपवली जाते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, कुणी तरी त्याच्या मागावर आहे. तो त्याचा शोध घेतो आणि शेवटी ठरल्याप्रमाणे आपली कामगिरी फत्ते करतो.
'द डे बिफोर द बर्लिन वॉल- कुड वुइ हॅव स्टॉप्ड इट?' (२०१०) या अमेरिकन कादंबरीकार थॉमस एन्रिच एडवर्ड हिल यांच्या लांबलचक शीर्षकाच्या कादंबरीला 'अॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री ऑफ कोल्ड वार एस्पिओनेज' असं उपशीर्षकही आहे. ही कादंबरी दंतकथेवर आधारित आहे आणि अर्थात गुप्तचरही.
बर्लिन भिंत पडत असताना अमेरिकेला कसा दोष दिला जातो, असं कथानक असलेली अमेरिकन कादंबरीकार जॉन मार्क्स यांची 'द वॉल' (१९९९) हीसुद्धा गुप्तचर कादंबरीच आहे.
'वेस्ट ऑफ द वॉल' (२००८) ही कादंबरी उत्तर अमेरिकेत 'टड्रीज प्रॉमिस' या नावानं प्रकाशित झाली आहे. भिंतीमुळे नवऱ्यापासून ताटातूट झालेल्या बायकोची आणि तिच्या मुलाची ही गोष्ट आहे. (कादंबरीकार मार्सिया प्रिस्टन हेही अमेरिकनच.)
पीटर श्नायडर (Peter Schneider) यांची १९८२ साली मूळ 'Der Mauerspringer' या नावाने जर्मनमध्ये आणि १९८४ साली 'द वॉल जम्पर' या नावाने इंग्रजीत अनुवादित झालेल्या या कादंबरीतली मध्यवर्ती व्यक्तिरेखाच बर्लिन भिंत आहे. शारीरिक विभागणीपेक्षा मानसिक पातळीवरील फरकांना अधोरेखित करणारी ही कादंबरी भिंत ओलांडून जाणाऱ्या अनेकांच्या कहाण्या सांगते.
जर्मन कादंबरीकार थॉमस ब्रुसेग यांची 'हेल्डन वीइ वुइर' ही कादंबरी जर्मनीत १९९५ साली प्रकाशित झाली. तिचा इंग्रजी अनुवाद 'हीरोज लाइक अस' या नावानं १९९७ साली प्रकाशित झाला. पूर्णपणे राजकीय असलेली ही कादंबरी तिच्यातील उपहासात्मक शैलीमुळे वाखाणली गेली. या कादंबरीचा न-नायक हा नोबेल पारितोषिकापासून वंचित राहिलेला लेखक असतो. यातून दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध आणि बर्लिन भिंत पाडण्याचं कारस्थान यांच्यातील धागेदोरे स्पष्ट केले आहेत. पूर्व जर्मनीतील कम्युनिझमचा पाडाव रेखाटणारी ही कादंबरी समीक्षकांनी गौरवली आहे.
'फ्रेया ऑन द वॉल' (१९९७) ही जर्मन कादंबरीकार टी. डिजेन्स यांची कादंबरी वैयक्तिक आणि राजकीय इतिहासाची तपासणी करते. मोठय़ा प्रमाणावर प्रतीकात्मकता असलेल्या या कादंबरीची नायिका एक किशोरवयीन मुलगी असून तिचे नातेवाईक पूर्व-पश्चिम जर्मनीत असतात. बर्लिनची भिंत कोसळायच्या आधीची ही कादंबरी त्या वेळची सारी गुंतागुंत उलगडून दाखवते.
'स्लम्बरलॅण्ड' ही आफ्रिकन-अमेरिकन कादंबरीकार पॉल बिटी यांची कादंबरी २००८ साली प्रकाशित झाली. क्रूर, अवडंबरपूर्ण आणि तरीही उल्हसित करणारी ही कादंबरी आहे. डी जे डार्की हा या कादंबरीचा नायक जॅझचा बादशहा चार्ल्स स्टोनचा शोध घेत बर्लिनला येतो. जिथे एक गोरी बाई हद्दपार केलेल्या काळ्या आणि आफ्रिकन कामगारांना राबवून घेत असते. काळ्यांच्या ओळखीचा शोध घेणारी ही कादंबरी बर्लिन भिंतीच्या साक्षीनं घडते.
'स्टासीलॅण्ड' या ऑस्ट्रेलियन कादंबरीकार अॅना फंडर यांच्या कादंबरीचं 'स्टोरीज फ्रॉम बिहाइंड द बर्लिन वॉल' असं उपशीर्षक असून ती ग्रँटा मासिकाच्या प्रकाशन विभागानं २०११ साली प्रकाशित केली. पूर्व जर्मनीतील गुप्त पोलिसांना स्टासी म्हणत. अॅना यांनी वर्तमानपत्रात रीतसर जाहिरात देऊन गुप्त पोलीस म्हणून काम करणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्याआधारे हिटलर आणि स्टॅलिन यांच्या एकाधिकारशाहीचं चित्र त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. जॉर्ज ऑर्वेल यांच्या 'नाइन्टीन एटी फोर' या कादंबरीशी 'स्टासीलॅण्ड'ची तुलना समीक्षकांनी केली आहे.

Monday, November 3, 2014
मातीत रमणारा अभिनेता!
| अनिल अवचट, निळू फुले आणि अमरापूरकर |
त्यांची एक आत्या आळंदीला राहायची. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला वारीबरोबर पायी चालत जायची. अमरापूरकर तिच्यासोबत तीन-चार वेळा आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत गेले. आळंदीला संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सोनोपंत दांडेकर राहत. ते वारकरी संस्थेचे अध्यक्ष होते. ते कथा, प्रवचन करत, शिकवत. टाळ कसे वाजवायचे, कीर्तनाला उभं कसं राहायचं, कशी सुरुवात करायची, या गोष्टी अमरापूरकर त्यांच्याकडून शिकले.
अमरापूरकर यांना वाचनाची गोडी लागली ती त्यांच्या आजोळला, आष्टीला. त्यांना गोष्टी ऐकायला आवडायचं. मीना नावाची बहीण त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवायची. तिच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्याचा त्यांना छंदच लागला होता. तिथं त्यांनी पहिलं पुस्तक ऐकलं ते 'शामची आई'. साने गुरुजींच्या पुस्तकांनी त्यांना वाचनाची गोडी लावली, ती शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्याकडे पाच ते सहा हजार पुस्तकं होती. ते रोज किमान तीन तास वाचन करत. मराठी-इंग्रजीतील नवनव्या पुस्तकांबाबतचं त्यांचं वाचन अतिशय अद्ययावत म्हणावं असं होतं. उदा. महाराष्ट्रात सेझचा प्रश्न गाजत होता, तेव्हा त्यावर एक कादंबरी आली होती. अमरापूरकरांनी ती लगेच मिळवून वाचली.
नगरलाच अहमदनगर एज्युकेशन सोसायटी नावाची न्या. रानडे यांनी बांधलेली शाळा आहे. अमरापूरकर तिचे विद्यार्थी. शालेय वयात ते अत्यंत हूड विद्यार्थी होते, पण क्रिकेट चांगले खेळायचे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर क्रिकेट सुटलं आणि नाटक सुरू झालं. त्या दोन-चार वर्षांत मुंबईची प्रचंड नाटकं नगरला आली. त्या काळी मुलांना आठ आणे तिकीट होतं. अमरापूरकर प्रत्येक नाटक पाहायचे. त्या काळात त्यांनी प्रचंड नाटकं पाहिली.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नगर महाविद्यालयात गेले. भालचंद्र नेमाडे, मधुकर तोरडमल हे प्राध्यापक त्यांना शिकवायचे. त्या दरम्यान त्यांच्या मित्रानं एकांकिका करायला सुरुवात केली होती. त्यात अमरापूरकरांना नोकराचं काम मिळालं; पण आयत्या वेळेला हिरोचं काम करणारा मुलगा निघून गेला आणि ती भूमिका त्यांच्याकडे आली. त्या एकांकिकेला आणि अमरापूरकरांना उत्तेजनार्थ दहा रुपयांचं बक्षीस मिळालं. ती - 'पेटलेली अमावस्या' - त्यांची पहिली एकांकिका.
त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर 'छिन्न', 'हँडसअप', 'काही स्वप्नं विकायचीयत', 'हवा अंधारा कवडसा', 'ज्याचा त्याचा विठोबा' अशा विविध नाटकांत काम केलं.
अमरापूरकर यांचे वडील महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काँग्रेसकडून निवडून गेलेले. शिवाय वडील एक अनाथ संस्था चालवत, शेतकी शाळा चालवत. मुलानं शिकून नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तरीही सुरुवातीला मुलगा नाटक करतोय म्हटल्यावर त्यांनी उत्तेजन दिलं; पण लग्न होऊन दोन मुलं झाली तरी अमरापूरकर नाटकच करत आहेत हे पाहिल्यावर मात्र त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. वडील अमरापूरकरांना 'नाच्या' म्हणत. तरीही वडिलांचा विरोध पत्करत त्यांनी नाटकं करणं चालूच ठेवलं. या काळात त्यांच्या पत्नी, सुनंदा यांनी त्यांना खूपच खंबीरपणे साथ दिली. पदवीधर झाल्यावर अमरापूरकरांनी परभणीला ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून नोकरीही करायला सुरुवात केली, पण ते वातावरण त्यांना मानवलं नाही. शिवाय आणीबाणीचा काळ. त्या वातावरणातील मुस्कटदाबीला कंटाळून त्या नोकरीचा त्यांनी सहा महिन्यांत राजीनामा दिला. नंतर ते नोकरीसाठी जातो आहे, असे सांगून पुण्याला नाटक करायला आले. तेव्हा घरची आघाडी सांभाळून सुनंदाताईंनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांची उमेद वाढवण्याचं मोठं काम केलं.
'अर्धसत्य'मुळे अमरापूरकरांच्या जीवनात मोठा बदल झाला. मराठीतील शैलीदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांच्याकडून कथा-पटकथा लिहून घेऊन 'अर्धसत्य' हा चित्रपट १९८४ साली केला. त्यात रामा शेट्टीची छोटीशी भूमिका अमरापूरकर यांनी केली; पण त्यांच्या या छोटय़ा भूमिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्या संदर्भातील दोन किस्से रंजक आहेत.
या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर अमरापूरकर गावी नगरला गेले. त्यांच्या मोठय़ा भावाला बाहेरगावी जायचं असल्याने वडिलांनी त्यांना तोपर्यंत किराणा मालाचं दुकान सांभाळायला सांगितलं. दरम्यान 'अर्धसत्य'च्या प्रीमिअरची तारीख जवळ आली. अमरापूरकरांनी त्याबाबत वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, ''तो मुंबईत आहे ना, तू दुकान सांभाळ.'' त्यानंतर आठ-दहा दिवसांनी अमरापूरकर नगरहून एसटीने निघून पहाटे दादर बस स्टॅण्डला उतरले. तोवर 'अर्धसत्य'मधील रामा शेट्टी मुंबईत सर्वाना माहीत झाला होता. त्यामुळे त्यांना पाहताच टॅक्सीवाल्यांनी त्यांच्याभोवती गलका केला. एकानं बळजबरीनं त्यांना टॅक्सीत बसवून त्यांच्याकडून पैसेही न घेता त्यांना घरी सोडलं.
'अर्धसत्य'च्या कथेचे मूळ लेखक श्री. दा. पानवलकर यांनी या चित्रपटाविषयी 'शूटिंग' (१९८५) या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी ओम पुरी आणि अमरापूरकर यांच्या समोरासमोरच्या दृश्याविषयी लिहिले आहे - ''इथं सदाशिव अमरापूरकरांचा रामा शेट्टी फार समजदारीनं संवादांतील सम खटकन पकडतो. हे सगळं दृश्य सदाशिव अमरापूरकर यांनी विनासायास अभिनयानं झक्कास तोलून धरलं. फिल्मी दुनियेत हे त्यांचं पदार्पण, पण 'वामना'च्या पहिल्या पावलासारखं नेमकं आणि भक्कम.''
त्या एवढय़ा भूमिकेवरून अमरापूरकरांना १८० चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यांची तुलना अमरीश पुरीशी केली गेली.
त्यानंतर आजतागायत त्यांनी ४५० हून अधिक हिंदी चित्रपटांत आणि ७०-८० मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. याशिवाय भोजपुरी, गुजराती, बंगाली, उडिया चित्रपटांमध्ये काम केलं. अमरापूरकरांनी अमान जलाल यांच्या मालिकेत लोकमान्य टिळकांची छोटीशी भूमिका करून रुपेरी कारकीर्द सुरू केली, तर 'राज से स्वराज तक' या मालिकेत टिळकांची मोठी भूमिका केली. श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'तील म. फुले आणि 'सडक', 'हुकूमत', 'ऐलान-ए-जंग' या चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिका त्यांना स्वत:लाही आवडलेल्या होत्या, तर मराठीतील सुमित्रा भावे यांच्या 'वास्तुपुरुष'मधील भूमिका त्यांना सर्वात आव्हानात्मक वाटली होती.
अमरापूरकरांनी 'कन्यादान'सारख्या काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्याचबरोबर 'किमयागार' हे नाटकही लिहिलं. वयाच्या सहाव्या वर्षी, श्रवण-दृष्टी-वाचा हरवून बसलेल्या हेलन केलर या अमेरिकी मुलीला तिची शिक्षिका अॅनी सुलेवान यांच्या अथक प्रयत्नांनी भाषा सापडते आणि तिच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडून येतं. त्या दोघींच्या आयुष्यावर पुढे याच नावानं एक नाटक अमेरिकन रंगभूमीवर आलं. त्याचं 'किमयागार' असं अगदी अचूक मराठीकरण वि. वा. शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर या लेखकद्वयांनी केलं. या दोघांचं नाव लेखक म्हणून या नाटकाला असलं तरी हे नाटक पूर्णपणे अमरापूरकरांनी लिहिलं आहे. शिरवाडकरांनी काही सुधारणा व थोडेफार बदल केले आहेत.
रिचर्ड बोलेस्लाव्हस्की यांच्या 'अॅक्टिंग - द फर्स्ट सिक्स लेसन्स' या पुस्तकावर आधारित सदाशिव अमरापूरकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांनी 'अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावर काहीशी टीका झाली असली तरी अशा प्रकारचं हे मराठीतील पहिलंच पुस्तक आहे. आनंद पटवर्धन यांच्या 'वॉर अॅण्ड पीस' या लघुपटावरील त्यांचा लेख बराच गाजला होता.
सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या संस्था-संघटनांशीही अमरापूरकर संबंधित होते. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी झालेल्या 'लग्नाच्या बेडी' या नाटक संचात ते होते. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वध्र्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते.
अमरापूरकरांना अनेक गोष्टींविषयी उत्सुकता असे. वाचन तर ते सततच करत; पण ते पेन्सिल स्केचिंगही चांगल्या प्रकारे करत. शूटिंगदरम्यानच्या काळात वेळ मिळेल तेव्हा ते वाचन किंवा पेन्सिल स्केचिंग करत असत. एकदा त्यांना जपानी लेखक मासानोबु फुकुयोका यांचं 'एका काडातून क्रांती' हे नैसर्गिक शेतीविषयीचं पुस्तक मिळालं. ते वाचून अमरापूरकर भारावून गेले. त्यांनी पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याजवळ अर्धा एकर शेत विकत घेतलं. तिथं नैसर्गिक पद्धतीची शेती करायचा प्रयत्न केला. त्या शेताच्या आजूबाजूला त्यांनी किती तरी झाडं लावली. सुरुवातीची तीन र्वष त्यांचं पीक जळून गेलं. एकदा त्यांनी भुईमूग पेरला. त्या वर्षी किती तरी पोती भुईमूग झाला.
अमरापूरकरांनी खलनायकी भूमिका चित्रपटांतून केल्या असल्या तरी त्यांच्यातला माणूस अतिशय संवेदनशील, हळुवार होता. फिल्मी दुनियेत राहून ते तिथे कधी रमले नाहीत. ते रमायचे वाचनात, नाही तर शेतात.
Subscribe to:
Posts (Atom)