Sunday, October 2, 2011

मराठा समाज - वास्तव आणि अपेक्षा

मित्रहो, 
ग्रंथ ज्या हेतुपूरस्सरतेने आणि संयमाने लिहिले जातात, तितक्याच हेतुपूरस्सरतेने आणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत.
- हेन्री डेव्हिड थोरो


जगाविषयीचे चुकीचे दृष्टीकोन, चुकीच्या नैतिक कल्पना, चुकीच्या वर्तन-सवयी हे सर्व घटक आमच्या दुखांची कारणे आहेत असे मला वाटते.
-   रसेल
मराठा समाज संपादित करताना हाच विचार आमच्या मनात होता आणि आहे. त्यामुळे ही अवतरणे पुस्तकाच्या सुरुवातीलाच छापली आहेत. डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. भा ल भोळे, शांताराम पंदेरे, ताराबाई शिंदे, डॉ. सदानंद मोरे, प्रा. प्रकाश पवार, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. शेषराव मोरे, बाळासाहेब विखे - पाटील आणि वरुणराज भिडे या मान्यवर लेखकांचे विचार प्रगल्भ लेख असलेले पुस्तक आम्ही संपादित केले असून ते नुकतेच राजहंस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. ते आपण जरूर पहा आणि आपला अभिप्राय कळवा.

मराठा समाज - वास्तव आणि अपेक्षा

संपादक - राम जगताप \ सुशील धसकटे
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - २२६ , किंमत - २०० रुपये

No comments:

Post a Comment