Monday, April 9, 2012

ज्या वयात प्रेमात पडायला पाहिजे होते तेव्हा पडलो नाही!

' चेहरे बोलतात, डोळे बोलतात' असा एक लेख काही वर्षांपूर्वी आमचे मित्र विनय हर्डीकर यांनी लिहिला होता. त्यात लग्न या विषयावर घनघोर आणि धीरगंभीर चर्चा करून झाल्यावर एके दिवशी एक परिचित महिला लेखकाला सांगते की, 'लग्न झाल्यावर सुरुवातीला आपण शुद्हीवर कुठे असतो? आणि जगाचे भान कुठे असते? आपण आपल्याच धुंदीत असतो. आमचा संसार तर गेंरेजमध्ये सुरु झाला.' लेखक लिहितो, हे एकले आणि लग्नाचे टेंशन एकदम उतरले.
पण असे धुंदीत असणारे लोक वेगले असतात. सर्वसाधारण जग तसे नसते. ते फार व्यवहारी आणि मतलबी असते. विचारापेक्षा तुमची सांपत्तिक स्थिति अशी आहे, यावर तुमचा वकुब जोखला जातो. तुम्ही भरपूर वाचता, छान लिहिता, तुमच्याकडे खुप पुस्तके आहेत, तुमचे विचार चांगले आहेत, देव-धर्म यावर तुमचा विश्वास नाही, जातपात तुम्ही मानत नाही, हे सगले चांगले आहे, पण तुमचे स्वताचे घर आहे का? पगार किती आहे? संसार करायचा तर ते महत्त्वाचे आहे, नाही का? असे विचारले जाते. पुणे - मुंबई या शहरात रहायचे तर घर हवे, ३०-४० हजार पगार हवा. नाहीतर लग्नाच्या बाजारात तुमची किंमत शुन्य. हे वास्तव कटु आहे.
लोक सुशिक्षित असतील तितके घर, पगार या गोष्टिंना जास्त महत्त्व दिले जाते. सुशिक्षित म्हणणाऱ्या मुलींनाही चांगला पगार आणि घर असणारा, म्हणजे सेटल्ड मुलगाच हवा असतो. बाकी त्याचे विचार आणि प्रगल्भता या गोष्टिना काही महत्त्व नसते. आपण सुशिक्षित आहोत, नोकरी करतो, तेव्हा मुलगाही सुशिक्षित आणि नोकरी करणारा असावा, अशा अपेक्षा कोणी करत नाही. स्वताच्या आणि जोड़ीदाराच्या हिम्मतिवर करून दाखवण्याची धमक कुणी दाखवत नाही. पाहिजे ते रेडिमेड. आणि आपण दोघे मिळून आपल्याला हवे ते कमउ असा प्रामाणिकपणा तर फारच दुर्मिळ झालाय.
अशी सारी स्थिति आहे. अशा स्थितीत संसारनामक व्यवहार पुरुषांच्याच ताब्यात राहणार नाही काय? नव्या प्रथा आणि पायंडे पडायचे तर त्यासाठी नव्या दिशेने विचार करायला हवा. आहे त्याच धोपट मार्गाचा स्वीकार करून चालणार नाही. कारण त्यातून आपल्याकडे दुय्यमपणाची भूमिका येते, इतपत विचारही केला जात नाही. हे फार म्हणजे फारच वाईट आहे. हिशेबीपणाने लग्नाचाही विचार केला जात असेल तर तो सरळ सरळ व्यवहारच होणार. आणि त्यात आपण स्वाभिमानिपनाने जगु शकणार नाही, पण याचे भय कुणाला पडलेले दिसत नाही. आहे ते तसेच चालू द्यावे आणि आपल्यावर अन्याय होतोय याचीही ओरड चालू ठेवावी असेच सारे मानून चालत असतील तर बदल कसे घडणार? हे म्हणजे शिवाजी इतरांच्या  घरात जन्माला यावा, त्याने आणखी कुणाशी तरी लढाई करावी आणि त्याचे फायदे मात्र आम्ही उपटावे असा प्रकार झाला!
एकेकाळी चळवळी होत्या, त्यामुल़े  तरुण - तरुणी भारावलेले होते. काहीतरी करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. त्या ध्येय वादातून समविचारी जोड़ीदाराची निवड केली जाई. तसा जोड़ीदर मिळावा म्हणून अनेकजन मुद्दामहून चळवळीत येत. जोड़ीदार मिळवत. पण आता चळवळीच  संपल्यामुले समविचारी जोड़ीदार मिळणे कठीण होउन बसले आहे.
हे सगल़े मी मित्राला सांगितल्यावर तो म्हणाला, अशी धुंदी अनुभवायची असेल तर त्यासाठी कुणाच्या प्रेमात का पडला नाहीस, लेका?
मी म्हणालो, तेच तर राहून गेले मित्रा. ज्या वयात प्रेमात पडायला पाहिजे होते, तेव्हा पडलो नाही आणि आता प्रेमात पडण्याचे वय राहिले नाही.

7 comments:

  1. "नव्या प्रथा आणि पायंडे पडायचे तर त्यासाठी नव्या दिशेने विचार करायला हवा. आहे त्याच धोपट मार्गाचा स्वीकार करून चालणार नाही. कारण त्यातून आपल्याकडे दुय्यमपणाची भूमिका येते, इतपत विचारही केला जात नाही. हे फार म्हणजे फारच वाईट आहे"
    तुमचे विचार आवडले, आपला समाज प्रत्येक नवीन गोष्टीकडे अविश्वासाने, संशयाने पाहतो. त्यातुन फक्त स्वत:चा फायदा झाला तर ती गोष्ट चांगली अशी समाजाची विचारसरणी आहे. प्रत्येक जण मनी ओरियेंटेड आहे; स्वत:च्या भोवताली वेगळ्या विचारसरणीचे लोक त्यांना सहनही होत नाहित. स्वत: सारख्या स्वार्थी कंपू जमा करुन नव्या विचारसरणीला वाळीत टाकतात. तशात आजकाल अनुकरण करावे, पावलांवर पाउल टाकून मार्गक्रमणा करावी असे पायही नजरेच्या टापूत नाहित. सरकारने माणसे दिवसरात्र कामात, पैसा कमावण्यात, तरुण पिढीला क्लासेस कॉलेज यात इतके काही गुंतवूण टाकले आहे की असा काही वेगळा विचार करायला हवा हे त्यांच्या ध्यानीही येत नाही. आल्यास साथ देईल अस कोणी नाही. काही वेगळं वागले तर सपोर्ट करण्यापेक्षा झिडकारणारे अधिक त्यातुन नेटाने पुढे गेल्यास नुकसान झाल्यावर तोंडावर सहानभूती मागुन तुच्छतापुर्वक टोमणे आणि फायदा किंवा काही भरीव असे झाल्यास जळफळाट. सर्वसामान्य समाज असाच आहे. चाकोरीतून जगू पाहणा-याला मान आहे. त्यामूळे समाजप्रिय व्यक्ती कितीही मनात असल तरी वेगळी वाट निवडू शकत नाही. भले दुय्यम भूमिका मिळाली तरी चालेल.
    आहे हे अस आहे. पण तरीही तुम्ही लिहित रहा. हे सर्व एके दिवशी बदलेल. कारण विचारांच्या प्रचाराने- प्रसाराने क्रांतीची सुरुवात होते

    ReplyDelete
  2. mulat lagna aaplyaithe aai-vadilanni tharavaychi goshta ahe ashi samaj rujleli ahe. tyamule arthatach muliche aai-vadil mulichya kaljipoti 'settled' mulgach baghtil..ani mulache aai-vadil ji mulgi navryachya khanya pinyachi 'kalji' gheil ashich baghnar.
    lagna karu icchinaryanni, lagna hi tyanchi swatahachi jababdari ahe, he samjun gheun, swahala ayushyacha jodidaar milavaycha ahe ya drushtikonatun shodh ghetla pahije. aai-vadil mulancha/mulinna ayushyatli khari maja, ji 'risk' ghenyamadhe aste tya pasun door thevtat asa mala vatta. aai-vadilanni jar sagli jababdari mula/mulinvar sopavli tar ekun sagle jasta samadhani hotil asa vatta.

    ReplyDelete
  3. Are, lagnaache ase kaahi vaybiy kaahi nasate. Prem karnyasaathi tar vay vicharaat ghenyaachi kaahich aavashyakata nasate. Te kunabaddal tari kunala tari 'vaatave' laagate itakech. matra anekda tase vaatlele vyakta karata yet naahi tyache kaay karayche ha prashna asu shakto. Aani tuze ase kaay vay laagun gele aahe re?
    Dusari gammat sangate. Tuch mhatlyapramane barechada muli patavanyasathi mule chalavalit yet, aani ti milali ki baaher jaat, mag kashi raahanaar chalval shillak? Aamchya pidhine he ase kele aani tumchi ashi haalat zali.... soooooo sorry

    ReplyDelete
  4. प्रेमात पडायला वय आड येत नाही. कोणत्याही वयात कोणीही कुणाच्याही प्रेमात पडू शकते. तू म्हणशील , तुम्ही इतक्या अधिकारवाणीने बोलताय म्हणजे ...! हो, मी अनेकदा प्रेमात पडलो आणि धडपडलो ! पहिले प्रेम तर लक्षात राहतेच अखेरपर्यंत ...असो. तू आज या वयातही प्रेमात पडायला हरकत नाही. तुझे काही फार वय झालेले नाही. मित्रा...इतका काय लाजतोस ? बिनधास्त प्रेम कर ...! प्रेम म्हणजे फक्त प्रेम असते !

    ReplyDelete
  5. parat ekda var saglyani lihileli mate me pan lihite... premat padayla vay lagat nahi... bedhadak premat padave lagte tyasathi. pan tu jar japun tolun mapun nemki mulgi milnyachi vat pahilis tar tyala premat padne mhanta enar nay. settled mulga have hi pan kahi chukichi apeksha nay. karan premat aplyala jagacha visar padlela asto ani lagna zalyavar aate-dal ka ki kasla kasla bhav mahit hoto. mag tya garaja purya karta karta damchak hote ani mag prema peksh vyvavhar bara vatayla lagto. tu itka nirash hou nakos mitra karan khup mule future plannng karun halu halu settle hotat. aajche jag he prachand spardheche dhavpaliche ahe, jyat premaitkech muliche career tichya avdinivdi yanahi main priority aste. fakt sansar eke sansar karun chalat nahy. doghanvarhi kamache pressure , deadlines astat. tyamule purvichya kali kase changle hote yacha vichar karnyapeksha pudhe ankhi kay changle karta yeil yacha vichar kelela bara nahi ka?? are jagat enjoy karta enyasarkhya khup goshti ahet ani thodese planning kele ki sarva kahi hou shakte. tyamule adarshvadi vichar sodun de.... ani "Prem kar Bhillasarkhe Banavarti Khochlele" hi kavita 17 vela tari vach. ALL THE BEST!

    ReplyDelete
  6. स्नेहल शास्त्री (पुणे) कडून - Bedhadak premat padave mhantat pan pudhchya saglya goshtincha pan vichar thoda karne garjeche aste. Karan ha ayushyacha prashna asto. Ani tevdhi samaj yenyasathi yogya te vay lagte he nakki. Pratyekachi ek vel yete aste ani tenvach tyala te sagl milte he hi khare asle tari toparyant cha sayam thevla ki lagna nantarche ayushya changle hote karan thode dyache ani thode milvayche ase he nate aste. Tyamule saglya dagdanvar pay thevun sagli kade samtol tevun aplya priorities apan tharvun gheun nehmich tyapramane karyakram akhale ki mag kontahi problem yet nahi....ya sarkhya goshti karne avghad asle tari ekda karun pahayla kay harkat nahi na....nantar sagle tumchech hote....

    ReplyDelete
  7. रामभाऊ,
    प्रेमात पडताना एवढा विचार करत बसलात तर कसं व्हायचं? -सरळ मुटका मारा.
    लग्न करताना विचार करायला हरकत नाही. पण तो पुढचा टप्पा.
    आणि असं काय तुझं वय झालं आहे?
    एक कविता लोकसत्तात लिही. 'अनाम प्रेमिकेस'. बघ, कसा चमत्कार घडतो ते !
    माझ्या शुभेच्छा.
    'शुभेच्छुक'(?),
    मुकुंद टाकसाळे

    ReplyDelete